सोनुर्ली येथे २१ रोजी श्री देवी भवानी गोंधळोत्सव
04:07 PM Jan 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
सोनुर्ली - पाक्याचीवाडी येथील भवानी मंदिरात श्री देवी भवानी त्रैवार्षिक गोंधळोत्सव मंगळवार २१ जानेवारी रोजी साजरा होणार आहे.त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७ वाजता श्री देवी भवानीची विधीवत पूजा,दुपारी १२ वाजता बकरा मानविणे,१ वाजता देवीचे दर्शन व ओटी भरणे कार्यक्रम,२ वाजता महाप्रसाद,रात्री ९ वाजता विधीवत मांडमांडावळ,१०.३० वाजता गोंधळ घालणे व देवीची मशाल फिरवणे,१.३० वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग,पहाटे ५.३० वाजता गोंधळ घालणे व देवीची मशाल फिरविणे लाभ घेण्याचे आवाहन हिराप बंधू व ग्रामस्थांनी केले आहे.
Advertisement
Advertisement