For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कोलगाव श्री सातेरी मंदिरात २२ ते २४ दरम्यान धार्मिक कार्यक्रम

05:21 PM Jan 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कोलगाव श्री सातेरी मंदिरात २२ ते २४ दरम्यान धार्मिक कार्यक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी)
अयोध्येत श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या औचित्यानिमित्त कोलगाव येथील श्री सातेरी मंदिरात सोमवार २२ ते बुधवार २४ जानेवारी दरम्यान सहोम नवचंडी याग अनुष्ठानचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने रविवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कुळ घराकडून देवतांचे तरंगकाठीसह वाजत गाजत श्रीदेवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम होणार आहे. सोमवार २२ जानेवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान शांतीपाठ, श्रीरामरक्षास्तोत्र पठाण, यजमान देहशुद्धी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम होतील. तसेच देवी पूजा, आरती, महानैवैद्य, तीर्थप्रसाद, ब्राह्मण भोज,न सुहासिनीसाठी देवीचरणी कुंकुमार्चन व महाप्रसाद होईल. मंगळवार २३ रोजी सकाळी ७ वाजल्या पासून विविध धार्मिक कार्यक्रम, ९.३० वाजता सुहासिनीसाठी कुंकुमार्चन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ८ दरम्यान सुहासिनीसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, ८ वाजता श्री मोरेश्वर दशावतार कंपनीचा नाट्यप्रयोग होईल. बुधवार २४ जानेवारी सकाळी १० वाजता अभिषेक, दुपारी महाप्रसाद, ३ वाजता देवतांचे तरंगकाठी सह कुळघरी प्रस्थान झाल्यावर कार्यक्रमाची सांगता होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थान मानकरी, ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.