For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तान-चीनमध्ये धार्मिक स्वातंत्र्य संकटात

06:48 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तान चीनमध्ये धार्मिक स्वातंत्र्य संकटात
Advertisement

अमेरिकेच्या आयोगाचा अहवाल : पाकिस्तानने फेटाळला दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेने पाकिस्तान आणि चीनचे नाव धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाप्रकरणी चिंताजनक स्थिती असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट केले आहे. या यादीत म्यानमार, रशिया, इराण, उत्तर कोरिया आणि सौदी अरेबिया समवेत अनेक देशांचे नाव सामील असल्याचे अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.

Advertisement

संबंधित देशांना कंट्रीस ऑफ पर्टिक्युलर कंसर्नच्या (सीपीसी) यादीत सामील करण्यात आले आहे. या देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाशी निगडित गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तर पाकिस्तानने अमेरिकेचा अहवाल फेटाळला आहे.

अमेरिकेच्या अहवालाचा दावा एकतर्फी, भेदभावपूर्ण आणि मनमानी निकषांवर आधारित आहे. अशाप्रकारचे पाऊल जागतिक स्तरावर धार्मिक स्वातंत्र्य पुढे नेण्याच्या पाकिस्तान आणि अमेरिकेच्या लक्ष्याला कमकुवत करत असल्याचे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

आम्ही बहुलवादी देश आहोत. आम्ही धार्मिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी अनेक पावले उचलली आहेत. धार्मिक असहिष्णुता, जेनोफोबिया आणि इस्लामोफोबियाला परस्पर विश्वास आणि सन्मानाच्या आधारावर तोंड देता येऊ शकते असा विश्वास पाकिस्तानला आहे. या मुद्द्यावर आम्ही अमेरिकेशी द्विपक्षीय स्वरुपात चर्चा केल्याचे पाकिस्तानकडून म्हटले गेले आहे.

पाकिस्तानात ईशनिंदा कायद्याच्या गैरवापराची चौकशी होत नसल्याने जागतिक स्तरावरून टीका होत असते. ईशनिंदा कायद्याचा गैरवापर करत हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, अहमदिया मुस्लीम यासारख्या धार्मिक अल्पसंख्याकांना पाकिस्तानात लक्ष्य केले जाते.

ऑगस्ट 2023 मध्ये पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे एक चर्च पेटवून देण्यात आला होता. तसेच चर्चवर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता. तर 2021 मध्ये ईशनिंदेचा आरोप करत एका मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. याचबरोबर सियालकोटमध्ये श्रीलंकन व्यवस्थापक प्रियंता कुमारा यांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.