For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कन्सल्टन्सी फर्म डेलॉइटचा दिलासा, 50 हजार भरती

06:06 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
कन्सल्टन्सी फर्म डेलॉइटचा दिलासा  50 हजार भरती
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

दिग्गज कन्सल्टन्सी फर्म डेलॉइट यांनी आपल्या विस्तार योजनेंतर्गत भारतात 50 हजार जणांना नियुक्त करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे तमाम इच्छुक भारतीयांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. डेलॉइट येत्या काळात 50 हजार प्रोफेशनल्सची भरती करणार आहे. ही बातमी अमेरिका इराण युद्धाच्या तणावाच्या वातावरणात सुखद धक्का देणारी नक्कीच आहे.

सध्याला जागतिक स्तरावर कंपन्यामध्ये आर्टिफिशीयल इंटेलिजन्समुळे नोकर कपातीची भीती व्यक्त होते आहे. अशावेळी डेलॉइट यांनी भारतात नोकर भरतीची नवी घोषणा करत सुखद धक्का दिला आहे. भारतीय नोकरदारांसाठी ही सुखावणारी बाब म्हणायला हवी. नोकरीचे संकट काहीअंशी याने दूर होण्यास मदत होणार आहे.

Advertisement

जागतिक स्तरावर पाहता डेलॉइटसाठी भारत हा महत्त्वपूर्ण देश राहिला आहे. कंपनीतील एकूण जागतिक कर्मचारी वर्गापैकी एक तृतियांश कर्मचारी वर्ग एकट्या भारतात काम करतो, अशी माहिती आहे. कंपनी भारतात एक क्वांटम सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याचे नियोजन करत आहे. जेथे भविष्यातील तंत्रज्ञानाबाबत काम केले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.