For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

23.14 लाखहून अधिक संशयास्पद पेन्शनधारकांना दिलासा

06:15 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
23 14 लाखहून अधिक संशयास्पद  पेन्शनधारकांना दिलासा
Advertisement

सामाजिक सुरक्षा : महसूल खात्याकडून पेन्शन सुरू ठेवण्याचे आदेश

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेसंबंधी महसूल खात्याने आढावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा महसूल मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या निर्देशावरून पडताळणी बाकी असलेल्या आणि वार्षिक उत्पन्न 32,000 रुपये ते 1,20,000 रुपयांपर्यंत असणाऱ्या लाभार्थ्यांची पेन्शन सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे संशयास्पद म्हणून ओळखल्या गेलेल्या 23,14,544 लाभार्थ्यांची पेन्शन विनाअडथळा सुरू राहणार आहे.

Advertisement

सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेत संध्या सुरक्षा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाप पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन, मनस्वीनी पेन्शन, एन्डोसल्फान पीडित पेन्शन, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीचे पेन्शन, अॅसिड हल्लाग्रस्तांचे पेन्शन यांचा समावेश आहे.

राज्य सरकारने सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्यांची पडताळणा सुरू केली आहे. ‘कुटुंब’ डेटाबेसमधील माहितीची राज्यातील सामाजिक पेन्शनधारकांच्या माहितीशी तुलना केली असता 23,14,544 लाभार्थ्यांची माहिती संशयास्पद आढळून आली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ‘संयोजन मोबाईल अॅप’द्वारे प्रत्यक्ष पडताळणी केली असता अनेक लाभार्थी दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास नसणे आणि वार्षिक उत्पन्न दाखल सादर न करणे या कारणांमुळे 18,06,032 संशयास्पद लाभार्थ्यांची पेन्शन तात्पुरती स्थगित करण्यात आली.

प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान ज्या लाभार्थ्यांची पेन्शन स्थगित करण्यात आली होती, त्यापैकी अनेकांचे वार्षिक उत्पन्न 32,000 रुपयांपेक्षा जास्त परंतु, 1,20,000 रुपयांच्या मर्यादेच्या आत असल्याचे आढळून आले. या श्रेणीत येणाऱ्या गरीब आणि पात्र लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या आदेशानुसार महसूल खात्याने 23.14 लाख लाभार्थ्यांची पेन्शन सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पुढील आदेशापर्यंत पेन्शन सुरू राहणार

महसूल खात्याने दिलेल्या आदेशानुसार, राज्यात संशयास्पद आढळून आलेल्या 23,14,544 संशयास्पद सामाजिक सुरक्षा पेन्शनधारकांपैकी प्रत्यक्ष पडताळणी बाकी असलेल्या आणि वार्षिक उत्पन्न 32,000 रुपये ते 1,20,000 रुपयांच्या मर्यादेत आहे, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांचे पेन्शन पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे. तांत्रिक कारणांमुळे पेन्शनपासून वंचित राहिलेल्या लाखो ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग आणि इतरांना हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

कमाल उत्पन्न मर्यादेत वाढ

सामाजिक पेन्शन योजनांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा 32 हजार रुपये होती. अनेक वर्षांपासून त्याच्यात बदल करण्यात आला नव्हता. परिणामी, अनेक लोक पेन्शनपासून वंचित राहिले हेते. आता ही उत्पन्न मर्यादा 1,20,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

- डॉ. जी. परमेश्वर, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री

Advertisement
Tags :

.