कोल्हापुरातील तीनशेपेक्षा अधिक प्रकरणांना दिलासा
कोल्हापूर :
राज्यशासनाने वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरण करणाऱ्या अभय योजनेला वर्षभरासाठी मुदत वाढ दिली आहे. कोल्हापुरातील 300 अधिक प्रकरण ज्यांची प्रलंबित आहेत त्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
कृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनींचे किंवा भाडेपट्टयाने दिलेल्या वर्ग-2 जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे. मात्र, राज्यात अशी रुपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या अभय योजनेस आणखी एक वर्षांची मुदत वाढ देण्यास मंगळवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
- नगर भूमापनमधील 105 प्रकरणांनाही दिलासा
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झालेल्या प्रकरणापैकी 105 प्रकरणे पंचनाम आणि चौकशीसाठी नगर भूमापन कार्यालयात दिली आहेत. त्यांच्याकडे ही प्रकरणे प्रलंबित आहेत. मुदत संपल्याने संबधित मिळकतधारकांना चालु बाजारभावाच्या 60 टक्के रक्कम भरावी लागणार होती. आता मुदत वाढ दिल्याने ही प्रकरणे असणाऱ्या मिळकतधारकांनाही दिलासा मिळणार आहे.