Kolhapur water supply : कोल्हापूरकरांना दिलासा, एक दिवस आड पाणीपुरवठ्याचा निर्णय महापालिकेकडून रद्द
कोल्हापुरात रोज अर्धा तास कमी पाणी मिळणार
कोल्हापूर -पाणीसाठा कमी होत असल्याच्या कारणावरून महापालिकेच्या वतीने एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यावर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर महापालिकेने एक दिवस आइ पाणीपुरवठ्याचा निर्णय सोमवारी मागे घेतला. त्यामुळे आता पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. मात्र रोज पाणीपुरवठा करत असताना त्यामध्ये अर्धा तासाची कपात करण्यात आली आहे. कडक उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तसेच एल निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त केली. उपलब्ध पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरविण्यासाठी महानगरपालिकेने एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
त्याची अमंलबजावणी मंगळवार (दि.५) पासून करण्यात येणार होती. परंतु यासंदर्भात नागरिकांमधून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.लाटकर, बोद्रे यांचे पत्रयासंदर्भात विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी आयुक्त डॉ. रााजेंद्र भारुड यांना निवेदन दिले. पाणीसाठा कमी होत असल्याचे कारण देत महापालिकेने एक दिवस पाणी आड पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. वितरण व्यवस्थेमधील योग्य नियोजनाच्या अभावामुळेच महापालिकेला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचानिर्णय घ्यावा लागत आहे, ही निंदनीय बाब आहे. नागरिकांवर अन्याय करणारा हा निर्णय असल्याने तो रद्द करावा. त्याऐवजी वेगवेगळ्या प्रभागात पाणी वितरणाचा कालावधी कमी करून रोज समान पाणी वाटप करणे गरजेचे आहे, असे या पत्रात म्हंटले आहे.
दरम्यान महापालिकेने एक दिवस आड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करून पाणी पुरवठ्याबाबत नव्याने नियोजन केले आहे. त्यानुसार यापूर्वी पुईखडी जल शुद्धीकरण केंद्र येथून पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला तसेच चंबुखडी बैठी टाकी येवून वितरण होणाऱ्या भागाला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या नियोजनाची चाचणी घेतल्यानंतर मुख्य वितरण नलिका पूर्णपणे रिकाम्या राहत असल्याने त्या पुन्हा भरण्यास विलंब होत होता. परिणामी नियोजित वेळापत्रकानुसार दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी व लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत आज लोकप्रतिनिधी व झाली. संलग्न प्रशासन यांच्यात चर्चा त्यानुसार शहर तसेच उपनगरांमध्ये मंगळवार(दि.५) पासून रोज सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, निर्धारित वेळेत अर्धा तास कपात करून पाणीपुरवठा केला जाणार आहे. भविष्यात उपलब्ध पाणीसाठा, उन्हाळ्याचा कालावधी तसेच पावसाळा लांबल्यास आवश्यकतेनुसार अर्धा तासापेक्षा अधिक वेळ कपात करून दैनंदिन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तरी पाण्याचा काटकसरीने वापर करून नागरिकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.