For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीनला दिलासा

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीनला दिलासा
Advertisement

नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसकडून दाखल याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीला नोटीस जारी केली आहे. जॅकलीनने ठकसेन सुकेश चंद्रशेखरशी निगडित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी स्वत:च्या विरोधात ईडीकडून नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी याप्रकरणी ईडीला नोटीस जारी केली आहे. या पूर्ण प्रकरणी मी स्वत: एक पीडित असून गुन्हेगार नसल्याचा दावा जॅकलीनने केला आहे. उच्च न्यायालयात याप्रकरणी आता पुढील सुनावणी 29 जानेवारी रोजी होणार आहे. जॅकलीनने याचिकेद्वारे ईडीकडून दाखल पुरवणी आरोपपत्र तसेच न्यायालयीन कार्यवाही रद्द करण्याची मागणी केली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी करताना पक्षपातपूर्ण पद्धतीने काम केल आहे. ईडीने नोरा फतेही (अभिनेत्री)ला क्लीनचिट दिली, तर प्रत्यक्षात तिच्या कुटुंबाच्या सदस्याला तिच्या सांगण्यावरून सुकेश चंद्रशेखरकडून बीएमडब्ल्यू कार मिळाली होती असा दावा जॅकलीनकडून उच्च न्यायालयासमोर करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.