For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसाममधील पूरग्रस्तांना दिलासा!

02:53 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आसाममधील पूरग्रस्तांना दिलासा
Advertisement

राज्य सरकारकडून आपद्ग्रस्तांना 112 कोटी रुपये हस्तांतरित

Advertisement

वृत्तसंस्था

गुवाहाटी

Advertisement

आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी दिब्रुगढ येथील मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित एका कार्यक्रमात, शिवसागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलाघाट जिह्यांतील सुमारे 75,000 पूरग्रस्त कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरणद्वारे अंतरिम पूर मदत म्हणून 112 कोटी रुपये हस्तांतरित केले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला अंतरिम आर्थिक मदत म्हणून 15,000 रुपये देण्यात आले आहेत. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री केशव महंत हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. नुकत्याच आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत दिली जात आहे.

राज्यातील पूर मदतकार्याला आणखी गती देण्यात आली आहे. पूरग्रस्त भागांमध्ये मदत, पुनर्वसन आणि जनजीवन पूर्ववत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मदत वितरण केंद्रांची संख्या वाढवून 1,811 करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पुराच्या ताज्या परिस्थितीची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात मदत कार्याचा विस्तार केला जात असल्याचे सांगितले.

11.45 लाख लोक प्रभावित

29 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीसाठी जारी केलेल्या अधिकृत पूर बुलेटिननुसार, आसाममधील 25 जिल्हे, 77 महसूल मंडळे आणि 2,251 गावांना पुराचा फटका बसला आहे. या पुरामुळे 11.45 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून, 71,889 विस्थापित लोकांना सध्या 218 मदत शिबिरांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. पूरग्रस्त रहिवाशांना अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने 1,811 मदत वितरण केंद्रे स्थापन केली आहेत.

Advertisement
Tags :

.