For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांधकाम व्यावासायिकांना मनपाचा दिलासा

06:57 AM Jun 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांधकाम व्यावासायिकांना मनपाचा दिलासा
Advertisement

बांधकाम परवान्याची वैधता आता चार वर्षे

Advertisement

त. भा. प्रतिनिधी 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने शहरातील बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवान्याच्या वैधतेत वाढ करून दिलासा दिला आहे. दोन वर्षांवरून बांधकाम परवान्याची वैधता चार वर्षे करण्यात आली आहे. यामुळे एखाद्या अपार्टमेंटच्या बांधकामास विलंब झाल्यानंतरही बांधकाम व्यावसायिकाची चिंता मिटणार आहे.

Advertisement

क्रिडाई बेळगावच्यावतीने बांधकाम परवान्याची वैधता वाढवावी यासाठी अनेक वर्षांपासून महानगरपालिकेकडे पाठपुरावा सुरु होता. केवळ दोन वर्षे बांधकाम परवान्याची मुदत वैधता असल्याने अपार्टमेंट पूर्ण करताना व्यावसायिकाला कसरत करावी लागत होती. एखादा प्रकल्प सुरु करण्यास बँकांपासून प्रशासनाच्या सर्व प्रकारच्या परवानगी मिळेपर्यंत विलंब होत होता. त्यामुळे अनेक प्रकल्प पूर्ण होण्यास बराच कालावधी लागत होता. या दरम्यान बांधकाम परवान्याची वैधता संपल्यास बांधकाम व्यावसायिकाला पुन्हा महानगरपालिकेचे उंबरठे झिजवावे लागत होते.

क्रिडाईच्या पाठपुराव्याला यश आले असून युएलएमएस प्रणालीत नवीन तरतूद करण्यात आली आहे. यानुसार यापुढे बांधकाम परवान्याची वैधता चार वर्षांची असणार आहे. अतिरिक्त दोन वर्षाचा कालावधी उपलब्ध झाल्याने प्रकल्प पूर्ण करणे बांधकाम व्यावसायिक विकासक यांच्यासाठी सोयीचे ठरणार आहे. केवळ बांधकाम व्यावसायिकच नाही तर घर बांधणी करणाऱ्या प्रत्येकालाच या नव्या नियमावलीमुळे दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Tags :

.