रिलायन्सची विक्रमी झेप
06:39 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
भारतीय शेअर बाजारात बाजार भांडवल मूल्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने सोमवारी विक्रमी झेप घेतली होती. समभाग सोमवारी इंट्राडे दरम्यान 1.2 टक्के वाढत 1611 या नव्या विक्रमी स्तरावर पोहोचला होता. अमेरिकेने व्हेनेझुआलावर हल्ला केल्यानंतर कंपनीच्या तेल व्यवसायाला फारसा फटका बसणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर समभागांवर सकारात्मक परिणाम पहायला मिळाला. सलग चैथ्या सत्रामध्ये समभाग तेजीवर स्वार होता. गेल्या 12 महिन्यांमध्ये समभाग 31 टक्के वाढला.
Advertisement
Advertisement