रिलायन्सचा तिमाही निकाल 14 रोजी होणार सादर
मागील महिन्यात कंपनीचे समभाग 5 टक्क्यांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज 14 ऑक्टोबर रोजी आर्थिक वर्ष 2024-25 चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. कंपनीने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही निकालांची घोषणा करण्यासाठी बोर्डाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीपूर्वी म्हणजेच शुक्रवारी (11 ऑक्टोबर) रिलायन्सचे शेअर्स 2747 रुपये वर व्यवहार करत आहेत. गेल्या एका महिन्यात शेअरने 5 टक्क्यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. त्याच वेळी, या वर्षी समभाग 6 टक्क्यांनी वाढला आहे.
नफा वार्षिक आधारावर 5.45 टक्के कमी
आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा वार्षिक आधारावर 5.45टक्क्यांनी घसरला. एप्रिल ते जून या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 15,138 कोटी रुपये होता. त्याचवेळी, एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 16,011 कोटी रुपये होता.