For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिलायन्सचा तिमाही निकाल 16 रोजी होणार जाहीर

06:41 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिलायन्सचा तिमाही निकाल 16 रोजी होणार जाहीर
Advertisement

समभागावर दबाव, भांडवल मूल्यातही घसरण

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) ने आपल्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांची तारीख जाहीर केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य 16 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाहीच्या आर्थिक निकालांची घोषणा करून त्यांना मंजुरी देणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

एक्सचेंज फाइलिंगनुसार, संचालक मंडळाच्या बैठकीनंतर विश्लेषकांची एक बैठकही होईल, ज्यामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांच्या कामगिरीवर चर्चा केली जाईल. चार दिवसांत शेअर 8 टक्क्यांनी प्रभावीत राहिला. अमेरिकेच्या रशियन तेलासंदर्भात नव्या धोरणाचा परिणाम समभागावर दिसला. कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख कोटींनी घटलेले दिसून आले आहे.

Advertisement
Tags :

.