For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिलायन्सची 49 वी सभा 19 जून रोजी

06:55 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिलायन्सची 49 वी सभा 19 जून रोजी
Advertisement

प्रति समभाग 6 चा लाभांश मंजूर होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 19 जून 2026 रोजी होणार आहे. कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे की, ही सभा दुपारी 2:00 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे घेतली जाणार आहे. सदरच्या महत्त्वाच्या सभेत आर्थिक वर्ष 2025-26 साठी घोषित केलेला प्रति शेअर 6 चा लाभांश मंजूर होण्याची शक्यता आहे.

Advertisement

या वार्षिक सभेसोबतच, रिलायन्स इंडस्ट्रीजने लाभांश पात्रतेशी आणि भागधारकांच्या मतदानाशी संबंधित महत्त्वाच्या तारखांचीही घोषणा केली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पात्र भागधारकांना ओळखण्याकरिता 5 जून 2026 ही ‘रेकॉर्ड डेट’ निश्चित केली आहे. मतदानासाठी 12 जून ही अंतिम तारीख असून निर्णय डिजिटल माध्यमांद्वारे घेतले जाणार आहेत, असे कळते.

विविध विषयांवर चर्चा

कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत समाविष्ट केल्या जाणाऱ्या विविध प्रस्तावांवरील मतदानासाठी 12 जून, 2026 ही ‘अंतिम तारीख’ जाहीर केलीय. या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स धारण करणारे गुंतवणूकदार आपले मत देण्यास पात्र असतील. तथापि, कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये वार्षिक सभेच्या अजेंड्यावर चर्चा होणाऱ्या मुख्य मुद्यांविषयी अद्याप कोणतीही इतर माहिती दिलेली नाही. जियो आयपीओसंबंधीत निर्णयही घेतला जाईल.

Advertisement
Tags :

.