रिलायन्स रिटेल सुरू करणार स्पोर्ट्स स्टोअर्स
फ्रेंच स्पोर्ट्स रिटेलर डेकॅथलॉनसोबत स्पर्धा
मुंबई :
दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स रिटेल स्पोर्ट्स स्टोअर सुरू करण्याचा विचार करत आहे. याद्वारे, कंपनी कोविड-19 नंतर झपाट्याने वाढणाऱ्या क्रीडा बाजाराला लक्ष्य केंद्रीत करणार असल्याचे सांगितले आहे. कंपनीचे या क्षेत्रातले धाडसी पाऊल ठरणार आहे, हे नक्की. याद्वारे कंपनी फ्रेंच स्पोर्ट्स रिटेलर डेकॅथलॉनशी स्पर्धा करणार आहे.
वृत्तानुसार, कंपनी नवीन स्टोअरसाठी मोठ्या शहरांमध्ये मॉल्स आणि रस्त्यांच्या कडेला 8,000 ते 10,000 चौरस फूट जागा भाड्याने घेण्यासाठी वाटाघाटी करत आहे. मात्र, कंपनीने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
स्पोर्ट्सवेअरसाठी भारत वेगाने वाढणारी बाजारपेठ
स्पोर्ट्सवेअर कंपन्यांसाठी भारत सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. 1.4 अब्ज लोकसंख्येसह, भारत सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे आणि स्पोर्ट्सवेअर आणि फुटवेअर कंपन्यांसाठी सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपैकी एक आहे. बहुतेक जागतिक ब्रँड्स दोन दशकांहून अधिक काळ भारतात स्थित आहेत, क्रिकेट आणि इतर क्रीडा साहित्याची विक्री भागीदारी करून करतात.
रिलायन्स रिटेलचे पाऊल
रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे रिटेल युनिट आहे. रिलायन्स रिटेलने आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत 1.56 कोटी चौरस फूट क्षेत्रफळ वाढवून 1,840 नवीन स्टोअर्स उघडली आहेत.
फिटनेसबद्दल वाढती जागरूकता आणि अॅथलेटिक पोशाखांची वाढती मागणी यामुळे गेल्या दोन वर्षांत प्रमुख स्पोर्ट्स ब्रँड्सच्या विक्रीत वाढ झाली आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे केलेल्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, पुमा, डेकॅथलॉन, आदीदास, स्केचर्स सारख्या ब्रँडने आर्थिक वर्ष 2021 पासून वार्षिक 35-60 टक्केची वाढ साधली आहे. आर्थिक वर्ष 23 मध्ये या कंपन्यांचा एकत्रित महसूल 11,617 कोटी रुपयांचा होता.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये डेकॅथलॉनची कमाई 3,955 कोटी
रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे सादर झालेल्या माहितीनुसार, डेकॅथलॉनचा आर्थिक वर्ष 2023 मध्ये 3,955 कोटी महसूल होता, जो आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2,936 कोटी आणि आर्थिक वर्ष 21 मध्ये 2,079 कोटी होता. दोन वर्षांत प्रमुख स्पोर्ट्स ब्रँडच्या विक्रीत तेजी आली आहे.
एकूण स्टोअर्सची संख्या 18,836 पर्यंत वाढली आहे, ज्यात 7.91 कोटी स्क्वेअर फुटचे क्षेत्र आहे. रिलायन्स रिटेलचे उत्पन्न 10.7 टक्के वाढून 76,683 कोटी झाले. जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 69,288 कोटी होते. मागील तिमाहीत ते 83,040 होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशनप्रती ग्राहकांचा वाढता कल यामुळे प्राप्ती