For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचे पहिले ‘एआय’ डेटा केंद्र रिलायन्स-मेटा उभारणार

06:32 AM Jun 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचे पहिले ‘एआय’ डेटा  केंद्र रिलायन्स मेटा उभारणार
Advertisement

गुजरातच्या जामनगर येथे 168 मेगावॅट क्षमतेच्या डाटा केंद्राची बांधणी करणार : एआयमध्ये क्रांती आणणार 

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मेटा, रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारी करून भारतातील आपले पहिले एआय-सक्षम डेटा सेंटर उभारणार आहे. या भागीदारीअंतर्गत, गुजरातच्या जामनगर येथे 168 मेगावॅट क्षमतेच्या डेटा केंद्राची बांधणी करण्यात येणार आहे. जे दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित केले असल्याची माहिती आहे.

Advertisement

या दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीअंतर्गत, रिलायन्स जामनगर येथील डेटा सेंटरचा संपूर्ण विकास करेल. रिलायन्स या प्रकल्पासाठी डिझाइन, बांधकाम, युटिलिटी मॅनेजमेंट, रिन्यूएबल पॉवर, नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि मॅनेजड सर्व्हिसेस यासह एंड-टू-एंड सेवा प्रदान करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारत एआयमध्ये क्रांती करण्यास सज्ज : मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, मुकेश अंबानी म्हणाले, ‘मेटासोबतची ही भागीदारी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. मेटाने भारतातील पहिले बिल्ट-टू-सूट डेटा सेंटर उभारणे हे दर्शवते की भारत जागतिक एआय क्रांतीमध्ये आघाडीवर राहण्यास सज्ज आहे. जामनगर हायपरस्केल एआय कंप्युटिंगसाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनेल.’

एआय पायाभूत सुविधांचा विस्तार करणार : झुकरबर्ग

मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले, ‘भारतातील आमचे पहिले एआय-सक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी रिलायन्ससोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे. जामनगर येथील ही जागतिक दर्जाची सुविधा आम्हाला जागतिक स्तरावर आमच्या एआय पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यास आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील आमची दीर्घकालीन गुंतवणूक अधिक दृढ करण्यास मदत करेल.’

एआय पायाभूत सुविधा, ‘मेटाकंप्यूट’मध्ये मोठी गुंतवणूक

मेटा आपल्या वाढत्या एआय गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या क्षमतांचा विस्तार करण्यामध्ये गुंतवणूक करत आहे. झुकरबर्ग यांची ‘मेटा कंप्यूट’ नावाच्या उच्च-स्तरीय उपक्रमाद्वारे या दशकात ‘दशकांचे गिगावॅट्स’ आणि त्यानंतर शेकडो गिगावॅट्स निर्माण करण्याची योजना आहे.

क्लीनमॅक्स, फोर्थ पार्टनर एनर्जीची भागीदारीची घोषणा

मेटाने भारतातील दोन आघाडीच्या स्वच्छ ऊर्जा पुरवठादारांसोबत, डेटा सेंटरसह, सुमारे 1 गिगावॅट अक्षय उर्जेसाठी स्वतंत्र भागीदारीची घोषणा केली आहे. क्लीनमॅक्सतर्फे राजस्थान आणि कर्नाटकमध्ये 837 मेगावॅट क्षमतेचे नवीन सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प विकसित केले जातील.

Advertisement
Tags :

.