For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिलायन्स आता गुगलला मागे टाकण्याच्या तयारीत

06:26 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिलायन्स आता गुगलला  मागे टाकण्याच्या तयारीत
Advertisement

भारताचे सर्वात मोठे एआय केंद्र उभारण्याच्या तयारीत : 1.6 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ध्येय

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ची स्पर्धा आता अधिक तीव्र होणार आहे, कारण रिलायन्स इंडस्ट्रीजने (आरआयएल) एक अशी मोठी गुंतवणूक केली आहे, जी संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्राचे चित्र बदलून टाकण्याची शक्यता आहे. ही कंपनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे सुमारे 1.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक भव्य एआय डेटा सेंटर क्लस्टर उभारण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

हा केवळ एक प्रकल्प नसून, भारताला जागतिक डेटा शक्ती बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. विशेष बाब म्हणजे, हा प्रकल्प गुगलच्या 1 गिगावॅट डेटा सेंटरपेक्षा मोठा असेल, त्यामुळे हे स्पष्ट आहे की रिलायन्सला आता तंत्रज्ञानाच्या जगात वर्चस्व गाजवायची तयारी करीत असल्याचे समोर येत आहे.

गिगा एआय डेटा हब’ तीन टप्प्यांत उभारणार

सूत्रांनुसार, हा प्रकल्प तीन टप्प्यांत विकसित केला जाईल. पहिल्या टप्प्यात, पोलिपल्ली गावात 500 मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर उभारले जाईल, जे ऑक्टोबर 2028 पर्यंत व्यावसायिकरित्या कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. यानंतर, दुसऱ्या टप्प्यात एकूण क्षमता 1 गिगावॅटपर्यंत वाढवली जाईल. या संपूर्ण प्रकल्पासाठी कंपनीने सुमारे 935 एकर जमिनीची मागणी केली आहे, ज्यामध्ये डेटा सेंटर, केबल लँडिंग स्टेशन आणि डिसेलिनेशन प्लांटचाही समावेश आहे.

विशाखापट्टणम विशेष का आहे?

विशाखापट्टणम सध्या देशाचे नवीन डेटा सेंटर हब बनत आहे. गूगल, सिफी, डिजिटल कनेक्शन आणि अनंत राज क्लाउड यांसारख्या मोठ्या कंपन्या येथे आधीच त्यांच्या प्रकल्पांवर काम करत आहेत. आता रिलायन्सच्या प्रवेशामुळे ही शर्यत अधिक रंजक

होईल. हा संपूर्ण क्लस्टर भोगपुरम येथील नवीन विमानतळाजवळ विकसित केला जाईल, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत मोठा फायदा होईल.

आंध्र प्रदेश डेटा महासत्ता बनणार

आंध्र प्रदेश सरकारने 2025 पर्यंत 6 गिगावॅट डेटा होस्टिंग क्षमतेचे लक्ष्य ठेवले होते. आतापर्यंत 5.6 गिगावॅट क्षमतेचे सामंजस्य करार झाले आहेत आणि हा रिलायन्स प्रकल्प राज्याला या लक्ष्याच्या खूप जवळ घेऊन जाईल. कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार जीएसटी परतावा, भांडवली अनुदान आणि स्वस्त वीज यांसारख्या अनेक सुविधाही देत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजची ही गुंतवणूक केवळ एक व्यावसायिक पाऊल नाही, तर भारताला एआय आणि डेटा अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक नेता बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. जर हा प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला, तर विशाखापट्टणम जगातील सर्वात मोठ्या डेटा हबपैकी एक बनू शकते.

एआय आणि हरित उर्जेचा मिलाफ

रिलायन्स केवळ डेटा सेंटर्सच उभारत नाहीये, तर त्यासोबत अक्षय ऊर्जा प्रकल्पांचीही भर घालत आहे. कंपनी डेटा सेंटर्सवर सुमारे 1.08 लाख कोटी रुपये आणि हरित ऊर्जेवर 51,300 कोटी रुपये खर्च करणार आहे. यामध्ये 9000 मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनेल असतील, जे जास्तीत जास्त 6600 मेगावॅट वीज निर्माण करू शकतात. म्हणजेच, हा प्रकल्प पूर्णपणे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.