For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिलायन्स इंडस्ट्रिजची अमेरिकेत 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

06:41 AM Mar 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिलायन्स इंडस्ट्रिजची अमेरिकेत 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
Advertisement

तेल शुद्धीकरण केंद्र स्थापणार : ट्रम्प यांच्याकडून स्वागत

Advertisement

नवी दिल्ली :

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कंपनीकडून अमेरिकेत 300 अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक केली जाणार आहे. यासंदर्भातली घोषणा बुधवारी कंपनीकडून करण्यात आली आहे. जवळपास 50 वर्षानंतर नवे तेल शुद्धीकरण केंद्र सुरु करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. यादरम्यान या गुंतवणूकीचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केले आहे.

Advertisement

काय म्हणाले ट्रम्प

ट्रम्प यांनी एक्सवर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आम्ही रिलायन्स यांचं अमेरिकेत दिलखुलासपणे स्वागत करतो. रिलायन्स इंडस्ट्रिजचे अमेरिकेतले योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे. हा अमेरिकेसाठी मोठा फायदा असून अमेरिकेच्या इतिहासात हा सर्वात मोठा करार असल्याचेही ते म्हणाले.

रिलायन्स इंडस्ट्रिजचे नवे तेल शुद्धीकरण केंद्र हे अमेरिकेतील टेक्सासच्या ब्राऊनस्विल बंदराजवळ होणार आहे. यात कंपनी जवळपास 300 अब्ज डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूक करणार आहे. टेक्सासमधील तेल शुद्धीकरण केंद्र जवळपास 50 वर्षानंतर पुन्हा सुरु होणार असल्याचा आनंद असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

सद्य स्थिती

अचानक रिलायन्स यांच्या अमेरिकेतील गुंतवणूकीची बातमी आल्याने त्याबाबत वेगवेगळे कयास व्यक्त केले जात आहेत. मध्य आशियात सध्या अमेरिका इराण यांच्यात युद्ध सुरु असून याने तेलसंकट गडद झाले आहे. होर्मुजमध्ये कच्च्या तेलाची आयात अडकली असून भारतावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. या भागातून जगभरातील सुमारे 20 टक्के इतके कच्चे तेल रवाना होत असते. परिणामी जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला असून तेल, गॅसच्या किमती वाढल्या आहेत.

Advertisement
Tags :

.