For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 18645 कोटींवर

06:46 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 18645 कोटींवर
Advertisement

तिमाहीत महसुलात 10 टक्के वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शेअर बाजारात भांडवलमूल्यामध्ये अग्रस्थानावर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये कंपनीने डिसेंबरला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 18645 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत नफा नाममात्र 1 टक्का अधिक आहे. दुसरीकडे तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 2.74 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले असल्याचेही सांगितले जात आहे. एकूण उत्पन्नामधून कर्मचाऱ्यांचे वेतन, कर, कच्च्या मालाचा खर्च असे सारे खर्च वजा करुन कंपनीकडे 18645 कोटी रुपये निव्वळ नफ्याअंतर्गत शिल्लक राहतात. मागच्या वर्षी याच तिमाहीत 18540 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने मिळविला होता.

Advertisement

इतका मिळवला महसूल

तिसऱ्या तिमाहीमध्ये महसुलामध्ये देखील चांगली कामगिरी कंपनीने पार पडली आहे. 10 टक्के वाढीसोबत तिसऱ्या तिमाहीत 2.94 लाख कोटी रुपये इतका महसुल प्राप्त केला आहे.

समभागाची कामगिरी

गेल्या वर्षभरामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग 15 टक्के इतका वाढला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये समभाग 0.17 टक्के वाढला असून एक महिन्यामध्ये 5 टक्के इतका घसरला आहे.

Advertisement
Tags :

.