रिलायन्स, एचडीएफसी बँक-एअरटेलच्या कामगरिने बाजारात तेजी
मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स 230 व निफ्टी 91.95 अंकांनी वधारले
वृत्तसंस्था / मुंबई
चालू नवीन आठवड्यातील पहिल्या दिवशी नाताळनिमित्त सोमवारी बाजाराला सुट्टी राहिली होती. मंगळवारी बाजारात मात्र बाजारात एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, भारती एअरटेल, एनटीपीसी, अॅक्सिस बँक आणि एशियन पेन्ट्स या दिग्गज कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या जोरदार विक्रीचा फायदा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले.
जोरदार विक्रीच्या दरम्यान शेअर बाजारात काहीवेळ नकारात्मक स्थिती राहिली होती. मात्र यावेळी जागतिक बाजारातील सरकारात्मक स्थितीचा भारतीय बाजाराला लाभ झाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 229.84 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 71,336.80 वर बंद झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 91.95 अंकांनी वधारुन निर्देशांक 21,441.35 वर बंद झाले आहेत.
प्रमुख कंपन्यांमध्ये एनटीपीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, विप्रो, कोटक बँक आणि टाटा स्टील यांचे समभाग वधारले आहेत. तर जादा नफा कमाईत एटीपीसीचे समभाग राहिले असून जवळपास 2.44 टक्क्यांनी तेजी प्राप्त केली आहे.
अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील सहा समभाग हे अधिक प्रभावीत झाले आहेत. यामध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, टीसीएस, टाटा मोर्ट्स यांचे समभाग नुकसानीत राहिले. यावेळी बजाज फायनान्सचे समभाग हे सर्वाधिक 1.81 टक्क्यांनी प्रभावीत राहिले.
जागतिक घडामोडींचा परिणाम
भारतीय भांडवली बाजारात जागतिक विविध घडामोडींमध्ये मंगळवारी जागतिक पातळीवरील राजकीय स्थिती व फेडरल रिझर्व्ह बँकेने आपला व्याजदर स्थिर ठेवला आहे. यासोबतच आगामी काळातही याचा लाभ गुंतवणूकदारांना होणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांचे मत आहे. यामुळे आगामी काळातील प्रवासात अशा घटना
मोठा परिणाम करु शकणार आहेत.