रिलायन्सने कमविला 18,540 कोटींचा नफा
तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी : जिओने 6,861 कोटी मिळवले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतासह जगभरात प्रसिद्ध असणारी दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिसऱ्या तिमाहीमधील नफा कमाईचे आकडे नुकतेच सादर करण्यात आले आहेत. यामध्ये कंपनीने वार्षिक सरासरी 8.38 टक्क्यांच्या विकसित कामगिरीसह 18,540 कोटींची कमाई केली आहे. एक वर्षापूर्वी तिमाहीत हा नफा 17,565 कोटी रुपयांवर राहिला होता. ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान ऑपरेशनल महसूल 2.44 लाख कोटी रुपये राहिला आहे.
रिलायन्सच्या उपकंपन्यांचीही चमक
- जिओ :
जिओने 26 टक्क्यांच्या वाढीसह 6,861 कोटी रुपये नफा मिळवला आहे. मागील वर्षातील समान तिमाहीत नफा 5,447 कोटी रुपये होता. या दूरसंचार कंपनी जिओचा ऑपरेशनल महसूल वर्षाच्या आधारे 19.4 टक्क्यांनी मजबूत होत 33,074 कोटीवर राहिला.
2.ऑईल ते केमिकल्स
एकत्रित निव्वळ नफा 10 टक्क्यांनी वधारुन 3458 कोटीवर राहिला आहे. मागील वर्षाच्या समान तिमाहीत नफा 3145 कोटी रुपये होता. वार्षिक महसूल 6 टक्क्यांनी वधारत तो 1,50 लाख कोटींवर राहिला.
- रिटेलमध्ये चमकदार कामगिरी
रिलायन्स रिटेलचा महसूल वर्षाच्या आधारे 8.8 टक्क्यांनी मजबूत होत 90,351 कोटी रुपये झाला आहे. ईबीआयटीडीए वर्षाच्या आधारे जवळपास 9 टक्क्यांनी वाढून तो 6,840 कोटी रुपये झाला आहे.
4.ऑईल अॅण्ड गॅस :
तिसऱ्या तिमाहीत ऑईल अॅण्ड गॅस कंपनीचा महसूल 5 टक्क्यांनी कमी होत तो 6,370 कोटी रुपयांवर राहिला आहे. मागील वर्षात हा आकडा 6,719कोटी रुपये इतका होता.