For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उदयम्समधील हिस्सेदारी ‘रिलायन्स कंझ्युमर’ने केली खरेदी

06:18 AM Dec 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
उदयम्समधील हिस्सेदारी ‘रिलायन्स कंझ्युमर’ने केली खरेदी
Advertisement

30 वर्षे जुनी रेडी-टू-कूक ब्रेकफास्ट बनवणारी कंपनी  

Advertisement

नवी दिल्ली :

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची एफएमसीजी शाखा रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (आरसीपीएल) ने तामिळनाडूच्या उदयम्स अॅग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेडमधील मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली. या संयुक्त उपक्रमात आरसीपीएलची कंट्रोलिंग हिस्सेदारी असेल, तर प्रवर्तकांची अल्पसंख्य हिस्सेदारी राहिल. तथापि, कराराची आर्थिक माहिती अद्याप उघड झालेली नाही.

Advertisement

30 वर्षे जुनी उदयम्स अॅग्रो

उदयम्स अॅग्रो फूड्स ही 30 वर्षे जुनी चेन्नईस्थित कंपनी आहे. तिचा व्यवसाय सुमारे 668 कोटी रुपयांचा आहे. स्टेपल्स (तांदूळ, डाळी), मसाले, स्नॅक्स आणि रेडी-टू-कूक ब्रेकफास्ट मिक्स (इडली बॅटरसारखे) यांचा व्यवसाय मजबूत आहे. तामिळनाडू आणि शेजारच्या बाजारपेठांमध्ये मजबूत वितरण प्रणाली राबवणारी कंपनी असून टाटा कंझ्युमर, आयडी फ्रेश आणि एमटीआर सारख्या कंपन्यांसोबत स्पर्धा करते.

काय म्हणाले आरसीपीएल संचालक

आरसीपीएल संचालक टी कृष्णकुमार म्हणाले, उदयम्स ब्रँडची लोकप्रियता कधीचीच लाभलेली आहे. ते दशकांपासून निरोगी अन्न पर्याय प्रदान करत आहे. ते तामिळनाडूच्या समृद्ध वारसा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उत्कृष्ट गुणवत्तेचे प्रतिबिंब आहे. हा करार रिलायन्सच्या प्रमुख धोरणाचा एक भाग आहे. मजबूत प्रादेशिक ब्रँड खरेदी करून राष्ट्रीय स्तरावर व्यवसाय वाढवू इच्छिते. कंपनीने पेये आणि वैयक्तिक काळजीमध्ये हे यापूर्वी केले आहे.

Advertisement
Tags :

.