For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते रक्षक प्रतिष्ठानच्या गीताचे प्रकाशन,

03:56 PM Jan 05, 2026 IST | NEETA POTDAR
satara   साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते रक्षक प्रतिष्ठानच्या गीताचे प्रकाशन
Advertisement

                           साताऱ्यात रक्षक प्रतिष्ठानच्या गीताचे प्रकाशन

Advertisement

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रवास गेल्या दोन दशकापासून सुरू आहे. त्यांच्या रक्षक प्रतिष्ठानच्या गीताचे प्रकाशन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर येथे करण्यात आले. हे गीत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने खासदार उदयनराजे यांनी डीजेच्या सुरांचा आनंद घेतला.

रक्षक प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला आणि ध्येयाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणादायी गीताची गरज होती. ती गरज अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेल्या संगीत रचनेमुळे पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्षक प्रतिष्ठानच्या कार्यविस्ताराचा आमचा मानस आहे. या प्रतिष्ठानचे सामाजिक व्यासपीठ हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रेरणेने समर्पित असून सर्वसामान्य माणसाचा विकास हा या प्रतिष्ठानचा केंद्रबिंदू आहे.

Advertisement

या प्रतिष्ठानच्या कार्याला उभारी देण्याकरता या गीताची रचना करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांनी दिली. या गाण्याला प्रसिद्ध गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी आपला दमदार आवाज दिला आहे. रविवारी सकाळी एका अनौपचारिक कार्यक्रमांमध्ये उदयनराजे भोसले यांनी हे गाणे ऐकून त्याचे प्रकाशन केले. यावेळी रक्षक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.