महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एम. के. हुबळीतील ध्वज पुनर्स्थापित करा

10:27 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंदुत्ववादी संघटनांतर्फे तहसीलदार, पोलिसांना निवेदन

Advertisement

बेळगाव : एम. के. हुबळी येथे समाजकंटकांकडून हनुमानध्वज उतरविण्यात आला होता. याचा निषेध करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलतर्फे एम. के. हुबळी चलोची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. ध्वज पुनर्स्थापन करण्यासाठी संघटनेतर्फे  आठवड्याची मुदत दिली आहे. बजरंग दलाचे उत्तरप्रांत संयोजक पुंडलिक दळवाई यांच्या नेतृत्वाखाली एम. के. हुबळी चलोची हाक देण्यात आली होती. यावरून पोलीस व कित्तूर तहसीलदार यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मनधरणी केली. राज्यात काँग्रेस सत्ता आल्यानंतर हिंदू विरोधी धोरण अवलंबण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला. हनुमानध्वज उतरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. येथील  समाजकंटकांनी दुसऱ्या समाजाचा ध्वज फाडून एम. के. हुबळी येथील घरांवर असणारा तसेच हनुमान मंदिर समोरील ध्वजस्तंभ काढून टाकला आहे. हे कदापि सहन करणार नाही. ध्वजस्तंभ काढण्याचा आदेश दिलेल्या पंचायत अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. इतर समाजाचे ध्वज लावल्याबद्दल आपल्याला कोणताच आक्षेप नाही. मात्र हनुमानध्वज उतरवून वादाला तोंड फोडले आहे. हे कदापिही सहन करणार नाही. ध्वज आठवड्याभरात पुनर्स्थापित करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे देण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article