For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरवडेत नियमित योग वर्गांचे आयोजन

03:23 PM Jun 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
निरवडेत नियमित योग वर्गांचे आयोजन
Advertisement

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घोषणा

Advertisement

न्हावेली / वार्ताहर

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील निरवडे (ग्रामपंचायत निरवडे, प्रभाग तळवडे) येथे परिसंग्राम संघ आणि नवसंजीवनी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत PRI-CBO कन्वर्जन प्रोजेक्ट अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. यावेळी निरवडे गावच्या सरपंच सुहानी गावडे आणि उपसरपंच पेडणेकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. केरळहून आलेल्या कुटुंबश्री मेंटर गिरीजा मॅडम आणि BRP प्राची राऊळ पतंजली योगपीठ,क्लबच्या वतीने संघटन मंत्री महिला पतंजली दीपश्री खाडीकर हरिद्वारचे योगशिक्षक विद्याधर पाटणकर सर,तसेच प्रमोद नाईक, निशा कडावलकर,श्रेया बांदेकर आणि शिल्पा पडते या योगशिक्षकांनी उपस्थितांना योगाचे उत्तम मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिकेही सादर केली. "योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ" या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात सर्व समूहातील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.LRP चैताली गावडे परी ग्रामसंग पदाधिकारी नव संजीवनी पदाधिकारी CRP लिपिका प्रेरणा जाधव वैष्णवी गावडे रसिका पारकर वैष्णवी गावडे आरोही बांदिवडेकर राधिका जाधव समीक्षा जाधव अंकिता बा गकर प्रेरणा गावडे उपस्थित होते.आजच्या या योग दिनानिमित्त निरवडे गावासाठी एक आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली. हरिद्वारचे योगशिक्षक विद्याधर पाटणकर सर हे निरवडे येथे नियमित सार्वजनिक योगा कार्यक्रमाचे नियोजन LRP चैताली गावडे यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.