'एचएसआरपी' साठी परिवहन संकेतस्थळावरच नोंदणी करा
कोल्हापूर :
प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी शासनाच्या httpsë//transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसवावी. अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही साईट्स/लिंक चा वापर करू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालयाने 6 डिसेंबर 2018 रोजीच्या राजपत्रानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पासून उत्पादीत होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्याची तरतूद केली आहे. तसेच 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना 30 एप्रिल 2025 पर्यंत एचएसआरपी बसवण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत.
कोल्हापूर जिह्याकरीता M/s. Rosemerta Safety Systems Ltd या उत्पादक संस्थेची शासनाकडून नेमणूक करण्यात आलेली आहे. या नमूद उत्पादक संस्थेने झोननिहाय अधिकृत फिटमेंट सेंटर्सची नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार हे फिटमेंट सेंटर्स शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत आहेत. एचएसआरपी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत वाहनधारकांच्या अनभिज्ञतेचा गैरफायदा घेण्याच्या हेतूने सायबर गुन्हेगारांनी शासनाच्या एचएसआरपी संकेतस्थळा सारखी हुबेहूब बनावट साईट्स तयार केल्या आहेत. या बनावट साईट्वरती वाहनधारकांनी माहिती भरल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरून घेऊन फसवणूक केली जात आहे. अशाप्रकारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी इतर कोणत्याही बनावट साईट्स/लिंकचा वापर न करण्याची खबरदारी सर्व वाहन मालकांनी घेणे आवश्यक आहे.
वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक ( पाटी बसविण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबवावी.
httpsë//transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्या आणि HSRP हा Option सिलेक्ट करावा.या अर्जासोबत पुढे जाण्यासाठी तुमचे प्रादेशिक परिवहन कार्यालय निवडा (तुमच्या वाहन नोंदणी क्रमांकाचे पहिले 4 अंक निवडा)यानंतर Submit बटनावर क्लिक केल्यानंतर HSRP प्रक्रियेच्या संकेतस्थळावर आपणास अधिकृत फिटमेंट सेंटर्सचा तपशील प्रदर्शित होईल. त्यानंतर वाहनाशी संबंधीत मुलभूत माहिती नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासह भरावी. HSRP लावण्यासाठी सोईनुसार स्थापित बसविण्याची तारीख व वेळ निवडावी.आवश्यक शुल्क भरणा करावा (रोख पैसे देण्याची गरज नाही)
अपॉइंटमेंट तारीख व वेळेस अधिकृत फिटमेंट (निवड केलेल्या) सेंटरला भेट देऊन वाहनावर एचएसआरपी नंबरप्लेट बसवावा.