महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूजापाठाला स्थगिती देण्यास नकार

06:02 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ज्ञानवापीप्रकरणी मुस्लीम पक्षकारांना झटका

Advertisement

वृत्तसंस्था / प्रयागराज

Advertisement

वाराणसी येथील ज्ञानवापी स्थळाच्या तळघरात प्रारंभ करण्यात आलेल्या पूजापाठाला अंतरिम स्थगिती देण्यास उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी आता 6 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे. गुरुवारपासून येथे पूजापाठ करण्यात येत आहे.

17 जानेवारी 2024 या दिवशी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश दिला होता. ज्ञानवापीतील दक्षिण दिशेच्या तळघराचा ताबा वाराणसीच्या जिल्हा प्रशासनाने घ्यावा, असा हा आदेश होता. त्यानुसार प्रशासनाने या तळघराचे नियंत्रण मिळविले होते. नंतर या तळघरात हिंदूंचे पूजापाठ नित्य करण्यात यावेत. हे पूजापाठ करण्याचा अधिकार हिंदूंना आहे, असा निर्णय या न्यायालयाने दिला होता. तेव्हापासूनच येथे पुन्हा पूजापाठ करण्यात येत आहेत.

मुस्लीम पक्षकारांची तांत्रिक चूक

पूजापाठाला अनुमती देणाऱ्या आदेशाविरोधात मुस्लीम पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, ती मागताना त्यांनी 17 जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिलेले नाही. परिणामी, पूजापाठाविरुद्धच्या त्यांच्या आवेदनपत्राला काहीही अर्थ उरत नाही, असा युक्तिवाद हिंदू पक्षाचे विधीज्ञ विष्णू शंकर जैन यांनी केला. ही चूक दुरुस्त करून नवे आवेदनपत्र सादर करण्यात येईल, असे प्रतिपादन मुस्लीम पक्षकारांच्या वकीलांनी केले. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 6 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. तोवेळपर्यंत पूजापाठाला अंतरिम स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती मुस्लीम बाजूकडून करण्यात आली.

न्यायालयाचा नकार

मुस्लीम बाजूची अंतरिम स्थगितीची विनंती उच्च न्यायालयाने मान्य केली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आदेश देईपर्यंत पूजापाठ होत राहणार आहेत. उच्च न्यायालय कोणता अंतिम आदेश या प्रकरणी देईल, या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. हिंदू पक्षकार आपल्या पक्षात भक्कम पुरावा असल्याचे प्रतिपादन करीत आहेत. त्यामुळे 6 फेब्रुवारीची सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.

प्रशासनाला आदेश

वाराणसीत कायदा आणि सुव्यवस्था स्थिती राखली जावी, असा आदेश उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश राज्याच्या अधिवक्त्यांना दिला आहे. वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांवर शांतता राखण्याचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ही व्यवस्था राहणार आहे.

न्या विश्वेश यांचा आदेश

गेल्या बुधवारी वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी ज्ञानवापीचे तळघर हिंदूंसाठी उघडण्याचा आदेश दिला होता. जिल्हा प्रशासनाने आगामी 7 दिवसांमध्ये पूजापाठाच्या दृष्टीने सर्व सज्जता करावी. कायदा-सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवावी आणि तळघराचा प्रवेश मार्ग उघडावा, असे अनेक आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार प्रशासनाने त्वरित ही व्यवस्था केल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून, अर्थात गुरुवारच्या रात्रीपासूनच पूजापाठाला प्रारंभ करण्यात आला आहे. शुक्रवारीही दोनवेळा पूजा केली गेली, अशी माहिती देण्यात आली आहे.

शेकडो वर्षांपासून पूजा

या तळघरात शेकडो वर्षांपासून नित्य पूजा केली जात होती. ब्रिटीश राजवटीतही ही परंपरा होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1993 पर्यंत हा नित्य पूजापाठ होत असे. मात्र, डिसेंबर 1993 पासून तत्कालीन मुलायमसिंग यादव सरकारने या पूजेवर बंदी घालून तळघर बंद करून टाकले होते. आता ते पुन्हा उघडण्यात आले असून परंपरेनुसार येथे पूजापाठ केला जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article