ज्ञानवापीसंबंधी याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
कनिष्ट न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधित तीन याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पहिली याचिका ज्ञानवापी संकुलात शिवलिंगासारख्या मूर्तीची पूजा करण्यास परवानगी देण्याशी संबंधित होती. न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच दुसऱया याचिकेवर ज्ञानवापी येथे सापडलेल्या शिवलिंगासारख्या आकृतीच्या कार्बन डेटिंगच्या मागणीशी संबंधित असून या त्यावरीलही सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. जिल्हा न्यायालयात खटला प्रलंबित असल्यामुळे तेथे याचिका ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच ज्ञानवापी प्रकरणात मुस्लीम पक्षाने दाखल केलेल्या आक्षेपांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेला अनुषंगून खंडपीठाने जनहित याचिकांमध्ये ही मागणी कशी करता येईल, असा प्रश्न उपस्थित केल्याने न्यायालयाची भूमिका पाहून अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी याचिका मागे घेतली आहे. तसेच अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीच्या या याचिकेवर भाष्य करताना, ‘कनि÷ न्यायालयाचा आदेश येऊ द्या. समजा, कनि÷ न्यायालयातील निकाल तुमच्या विरोधात गेला, तर तुमच्याकडे कायदेशीर पर्याय आहे,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. सदर याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत स्थगिती दिली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय वाराणसी न्यायालयाच्या निकालाची वाट पाहणार आहे.