For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरत तिवारी एन्काउंटर प्रकरणी त्वरित सुनावणीस नकार

11:59 PM Jun 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
भरत तिवारी एन्काउंटर प्रकरणी त्वरित सुनावणीस नकार
Advertisement

सीबीआय चौकशीची याचिकेद्वारे मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात झालेले भरत भूषण तिवारी एन्काउंटर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी करविण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल झाली असून यावर लवकर सुनावणीची विशेष मागणी करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी त्वरित सुनावणी करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने याचिकाकर्ते वकिल विशाल तिवारी यांनी निर्धारित प्रक्रियेचे पालन करण्याची सूचना केली आहे. जलद सुनावणीसाठी सर्वपथम सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीशी संपर्क साधावा असा निर्देश न्यायालयाने दिला आहे. रजिस्ट्रीकडून अनुमती मिळाल्यावरच सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी कधी सुनावणी करणार हे स्पष्ट होणार आहे.

Advertisement

भरतच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात यावी. तसेच या एन्काउंटरमध्ये सामील सर्व पोलिसांच्या विरोधात त्वरित एफआयआर नोंदविण्यात यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. भूषण तिवारी हा बिलौती गावाचा रहिवासी होता. स्थानिक मुद्दे सोशल मीडियावर उपस्थित केल्यामुळे तो लोकप्रिय ठरला होता.

Advertisement
Tags :

.