‘कस्टम्स’मध्ये होणार सुधारणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कस्टम्सला आणखी पारदर्शक करणे आणि नियमांचे पालन सुलभ करण्यावरून केंद्र सरकार लवकरच मोठ्या सुधारणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. कस्टम्स (सीमाशुल्क) विभागात पूर्णपणे बदलाची आवश्यकता आहे, जेणेकरून त्याच्या नियमांचे पालन करणे सोपे ठरेल आणि ही प्रक्रिया थकविणारी किंवा अवघड वाटू नये असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
सरकारने यापूर्वीच प्राप्तिकर अधिनियमात सुधारणा करत प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्या तआली असून फेसलेस असेसमेंट (कुठल्याही अधिकाऱ्यालान भेटता कराचे मूल्यांकन) सुरू करण्यात आले असून कर प्रशासनात सुधारणा करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
आता याच सर्व चांगल्या बाबी कस्टम्समध्ये आणल्या जाणार आहेत. अधिकाऱ्यांच्या कमीतकमी हस्तक्षेपाद्वारे सामानाची तपासणी आणि क्लीयरेन्स होऊ शकेल तसेच मनमानी संपुष्टात येईल अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे लक्ष्य आहे. कस्टम्स माझे पुढील सर्वात मोठे सफाई अभियान आहे. आम्ही यासंबंधी व्यापक स्तरावर विचार करत आहोत. आम्ही मागील 2 वर्षांमध्ये सीमाशुल्क सातत्याने कमी केले आहे. तर ज्या सामग्रीवर शुल्क सध्या अधिक आहे, ते देखील आम्ही कमी करणार आहोत असे सीतारामन यांनी म्हटले आहे.
जीएसटी सुधारणा
जीएसटी दरांमध्ये कपातीचा प्रभाव सणासुदीच्या काळात दिसला आहे. जीएसटीचा पूर्ण प्रभाव मध्यम कालावधीत दिसेल आणि लोकांच्या खर्च करण्याच्या सवयींचे आकलन करण्याची गरज असल्याचे सीतारामन म्हणाल्या.