For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिफॉर्म एक्सप्रेस’ अधिक वेगाने धावणार : पुखराज राजपुरोहित

04:45 PM Feb 01, 2026 IST | अनुजा कुडतरकर
रिफॉर्म एक्सप्रेस’ अधिक वेगाने धावणार   पुखराज राजपुरोहित
Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त केले मत

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला  सिताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “रिफॉर्म एक्सप्रेस”ला आणखी वेग देणारा असल्याचे मत भाजप व्यापार उद्योग आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पुखराज राजपुरोहित यांनी व्यक्त केले.या अर्थसंकल्पात १२ लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद पायाभूत सुविधा विकासासाठी करण्यात आली असून त्यामुळे देशातील रस्ते, रेल्वे, लॉजिस्टिक्स, औद्योगिक कॉरिडॉर आणि शहरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मजबूत अर्थव्यवस्था आणि सशक्त भारताच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल आहे.यासोबतच अर्थसंकल्पात MSME क्षेत्रासाठी मोठी दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट सपोर्ट वाढवण्याचा निर्णय घेतला असून, ₹4,000 कोटींचा ‘आत्मनिर्भर भारत फंड’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे उद्योजकांना भांडवल उपलब्ध होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.हा अर्थसंकल्प उद्योग, व्यापार, रोजगार आणि विकास यांचा समतोल साधणारा असून भारताला आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरेल, असे राजपुरोहित यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.