बारसू, नाणारऐवजी रिफायनरी गुजरात, आंध्रमध्ये?
04:00 PM Nov 29, 2024 IST | Radhika Patil
Advertisement
१० ते १५ दशलक्ष टनाचे दोन प्रकल्प साकारणार
Advertisement
रत्नागिरी :
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पास झालेल्या तीव्र विरोधामुळे येथे प्रकल्प साकारण्याची शक्यता मावळत चालली असून त्या ऐवजी गुजरात आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांमध्ये १० ते १५ दशलक्ष टनाचे प्रत्येकी १ असे दोन प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने भारत सरकारने कार्यवाही सुरू केल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात भारत सरकारने सौदी अरेबियाशी बोलणीसुद्धा सुरू केल्याची बाब एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तातून पुढे आली आहे. गुजरातमध्ये रिफायनरीसाठी ओएनजीसीने सौदी अरामकोशी भागीदारी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर आंध्रमध्ये नियोजित रिफायनरीसाठी बीपीसीएलला सामील केले जाणार आहे.
Advertisement
Advertisement