For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीएसआय पदांसाठी फेरपरीक्षा घ्या!

06:31 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
पीएसआय पदांसाठी फेरपरीक्षा घ्या
Advertisement

उच्च न्यायालयाचा आदेश : याचिका फेटाळल्या

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील 545 पोलीस उपनिरीक्षपदांसाठी (पीएसआय) पुन्हा परीक्षा घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. याद्वारे राज्य सरकारने फेरपरीक्षेसंबंधी घेतलेला निर्णय न्यायालयाने उचलून धरला आहे. शिवाय पारदर्शक आणि न्यायसंमत पद्धतीने परीक्षा घेण्याची जबाबदारी सरकारने स्वतंत्र संस्थेवर सोपवावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

Advertisement

परीक्षेतील नेमणूक गैरव्यवहार झाल्याने सुरुवातीला लेखी परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यासंबंधी मागील भाजप सरकारने 29 एप्रिल 2022 रोजी पीएसआय नेमणुकीसाठी फेरपरीक्षा घेण्याचा आदेश दिला. मात्र, काही उमेदवारांनी हा आदेश रद्द करावा, अशी याचिका कर्नाटक प्रशासकीय लवादाकडे (केएटी) केली होती. तसेच कलंकीत उमेदवारांना (गैरव्यवहारात सामील असलेले उमेदवार) निवड यादीतून वगळून प्रामाणिक उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. तथापि, केएटीने 19 जुलै 2022 रोजी ही याचिका फेटाळली. त्यामुळे उमेदवारांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर न्यायमूर्ती पी. एस. दिनेशकुमार आणि न्या. टी. जी. शिवशंकरेगौडा यांच्या विभागीय खंडपीठाने 26 ऑक्टोबर 2023 रोजी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला असून पीएसआय पदांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे. कोलारमधील चंदन एन. व्ही. यांच्यासह शेकडो उमेदवारांनी 7 स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

Advertisement
Tags :

.