For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृषी खात्याच्या संचालकपदी रीना मिनेझिस

12:59 PM Mar 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
कृषी खात्याच्या संचालकपदी रीना मिनेझिस
Advertisement

गोव्याच्या इतिहासात प्रथमच महिलेची निवड

Advertisement

पणजी : गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कृषी खात्याच्या संचालकपदी एका महिलेची निवड गोवा सरकारने केली असून येत्या 1 एप्रिल रोजी सध्याच्या ज्येष्ठ अधिकारी व कृषी उपसंचालिका रीना मिनेझिस या संचालकपदाचा ताबा घेतील. कृषी खात्यावर आतापर्यंत सर्व संचालक हे पुऊष होऊन गेले. प्रथमच या खात्यावर संचालिका म्हणून एका महिलेची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कित्येक खात्यांची जबाबदारी महिलांकडे सुपूर्द केली आहे. एवढेच नव्हे तर दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारीपदी देखील एका महिलेची नियुक्ती केली आहे. गोवा विधिमंडळ सचिवपदी देखील एका महिलेची निवड करण्यात आली आणि महिलांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे उद्दिष्ट सफल तर झालेच शिवाय एक आदर्श निर्माण झालेला आहे. हाच मानदंड आता कृषी खात्याला लागू होत असून या खात्याच्या पहिल्या महिला संचालिका म्हणून सध्याच्या कृषी उपसंचालिका रीना मिनेझीस यांची नियुक्ती केली जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.