महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विप्रोकडून 6 हजार जणांची कपात

06:02 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा कंपन्यांकडून नोकर कपातीचे धोरण अवलंबले जात असल्याचे दिसून येते आहे. हल्लीच आयटी क्षेत्रातील डिग्गज कंपनी विप्रोने कर्मचारी कपातीचे धोरण राबवल्याचे समोर आले आहे.

Advertisement

काही दिवसापूर्वीच विप्रो कंपनीने आपल्या जानेवारी ते मार्च दरम्यानच्या तिमाहीचा नफ्याचा अहवाल जाहीर केला आहे. मार्च अखेरपर्यंत कंपनीने 6180 जणांना कंपनीतून कमी केले असल्याचे समोर आले आहे. अलग सहाव्या तिमाहीमध्ये विप्रो कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यापूर्वी इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टची सर्व्हिसेस या कंपन्यांनी देखील कर्मचारी कपातीचे धोरण राबवले होते.

यांनीही केली कपात

टीसीएस या कंपनीचा विचार करता आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 13000 हून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवले होते तर आणखीन एक दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसनेसुद्धा 25 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कमी केले होते. 2023 या वर्षामध्ये पाहता व्यवस्थापन पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वत:हून नोकरी सोडलेली आहे. हे प्रमाण जवळपास दहा टक्के इतके नोंदले गेले आहे.

घसरणीसह 2835 कोटीचा नफा

विप्रो कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून निव्वळ नफ्यात आठ टक्के इतकी घसरण नोंदवली आहे. मार्चला संपलेल्या तिमाहीत विप्रो कंपनीने 2835 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता समान तिमाहीत नफा आठ टक्के घटलेला असला तरी यामागच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये नफा पाच टक्के वाढीव दर्शवला गेला आहे. ब्लूमबर्ग संस्थेने 2771 कोटी रुपयांचा नफा होणार असल्याचे संकेत दिले होते, त्यापेक्षा जास्त नफा कंपनीने मिळवला आहे. सदरच्या मार्चच्या तिमाहीमध्ये विप्रोने 22208 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. जो 4.2 टक्के वर्षा मागच्या तिमाहीच्या तुलनेत पाहता कमीच नोंदला गेला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article