For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत : राज ठाकरे

06:42 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद  वदवतायंत   राज ठाकरे
Advertisement

मुंबई 

Advertisement

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यावर टीका केली.

गेले 2 दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी 2025 पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे.

Advertisement

एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयआर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा. तसेच  यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे ! तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल असे राज ठाकरे यांनी आपल्या म्हठले आहे.

Advertisement
Tags :

.