For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाट धुक्यामुळे दिल्लीत रेड अलर्ट

06:02 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
दाट धुक्यामुळे दिल्लीत रेड अलर्ट
Advertisement

110 विमानोड्डाणांना विलंब : कमी दृश्यमानतेमुळे रस्ते अपघात

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत धुक्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दाट धुक्मयामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग प्रभावित झाले आहेत. बुधवार, 27 डिसेंबरला सकाळी 7 वाजता दिल्लीतील पालममध्ये 50 मीटरपेक्षा कमी दृश्यमानता होती. दिल्ली विमानतळावर 110 विमानांना विलंब झाला. तर दोन उड्डाणे वळवण्यात आली. यापूर्वी मंगळवारी धुक्यामुळे 11 उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आली होती.

Advertisement

दिल्लीत दाट धुक्यामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. बरीच वाहने धुक्यात अडकल्यामुळे पर्यटकांचीही कोंडी झाली आहे. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दिल्लीबरोबरच उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती आहे. दृश्यमानता फारच कमी झाली आहे. धुक्यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मध्य प्रदेशात पुढील दोन दिवस दाट धुके सहन करावे लागणार असून नवीन वर्षात पाऊस आणि गारपीट अपेक्षित आहे.

पंजाब आणि हरियाणामध्येही सकाळचे दृश्य भयानक आहे. हेडलाईट्स लावून वाहने धावत आहेत. थंडीमुळे लोक थरथर कापत असल्यामुळे त्यांना शेकोटींचा आधार घ्यावा लागत आहे. छत्तीसगडमध्येही वारा आणि थंडीचा पुन्हा कहर सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत असून श्रीनगरमध्ये धुक्यासह कडाक्याची थंडी जाणवत आहे. एकंदरीतच सध्या संपूर्ण उत्तर भारतात थंडीमुळे हुडहुडी भरताना दिसत आहे.

Advertisement
Tags :

.