For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Nashik Rain | नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता बंद; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

11:55 AM Jul 08, 2026 IST | NEETA POTDAR
nashik rain    नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट  मुसळधार पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता बंद  गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ
Advertisement

नाशिक - जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अनेक भागांमध्ये धुवाधार पावसानं झोडपलं, ज्या ढगफुटीसदृश पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, त्यामध्ये काहीप्रमाणात दडी मारण्यात आली होती, पण आज पुन्हा एकदा पावसानं त्र्यंबकेश्वरसह भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.. आज हवामान खात्याने नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे...नाशिक जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे..

Advertisement

सकाळपासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रोड पुर्णपणे बंद झालेला आहे.. मोठ्या प्रमाणात पाणी पिंपळगाव बहुला परिसरात साचलेले आहे.. त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रोड हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे..

तर दुसरीकडे गोदावरी नदीच्या घाट परिसरात पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे.. नाशिकमध्ये काल पासुन मुसळधार पाऊस सुरु आहे.. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रशासन हाय अलर्टवर पाहायला मिळत आहे.. खबरदारीचा उपाय म्हणुन पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली आहे..

Advertisement

मंगळवारी (7 जुलै) नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली होती. नाशिकमध्ये इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर यासह काही भागात 300 मिलिमीटर पाऊस पडणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली होती. त्यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रशासन हाय अलर्टवर होतं. तसेच शाळांनाही सु्ट्टी जाहीर करण्यात आली होती.

नाशिकमध्ये सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये पडला आहे. इगतपुरीमध्ये 200 मिमी तर त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिमी पाऊस पडला. सुरगनामध्ये 149 मिमी पाऊस पडला. या व्यतिरिक्त बहुतांश ठिकाणी कमी पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement
Tags :

.