For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर भारतात 5 दिवस उष्मालाटेचा रेड अलर्ट

06:21 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तर भारतात 5 दिवस उष्मालाटेचा रेड अलर्ट
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

यंदा देशात मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी पावसाला अजूनही जोरदारपणे प्रारंभ झालेला दिसत नाही. देशातील अनेक भागांमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. येत्या अनेक दिवसांपासून उष्णतेपासून दिलासा मिळणार नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पुढील 4-5 दिवसात उत्तर भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्मयता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. याचदरम्यान ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या मते, 15 जूनपासून उत्तर प्रदेशच्या बहुतांश राज्यांसह उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि झारखंडच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्मयता आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि पंजाबच्या विविध भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. त्याचवेळी 17 जून रोजी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. तसेच ईशान्य राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू विभाग आणि ओडिशामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्मयता आहे. 18 जून 2024 रोजी हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या विविध भागात उष्म्याची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

दक्षिण, पूर्व भागात पावसाचा इशारा

‘आयएमडी’नुसार, 16 ते 18 जूनदरम्यान कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्मयता आहे. तर पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडमध्ये 16 जूनपर्यंत तीव्र उष्णतेची शक्मयता आहे. तसेच आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्मयता आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये तुरळक पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्मयता आहे.

Advertisement
Tags :

.