कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रादेशिक सेनेच्या भरतीला सुरुवात

06:59 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परराज्यातून शेकडो तरुण बेळगावात दाखल : वयोमर्यादा 18 ते 42 असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

प्रादेशिक सेनेतर्फे आयोजित भरती प्रक्रियेला शनिवारपासून प्रारंभ झाला. त्यामुळे परराज्यातून शेकडो तरुण बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला वयोमर्यादा 18 ते 42 असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या समोरील मैदानावर ही भरती होत आहे. शनिवारी गुजरात, गोवा व केंद्रशासित राज्यांसाठी भरती घेण्यात आली. प्रादेशिक सेनेच्या 106 पॅराशूट रेजिमेंट, 115 महार रेजिमेंट व गार्डस् रेजिमेंटच्या 125 व्या बटालियनमध्ये जनरल ड्यूटी पदासाठी भरती होणार आहे. रविवारी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तरुणांसोबत तेलंगणा व गुजरात येथील उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याने शनिवारी सायंकाळपासूनच गर्दी झाली होती.

रेल्वे स्थानकावर घेतला आसरा

भरतीसाठी परराज्यातून येणारे उमेदवार रेल्वे, बसने शहरात दाखल होत आहेत. रेल्वेस्थानक परिसरात शनिवारी अनेकांनी आसरा घेतला होता. त्याचबरोबर कॅम्प,  मिलिटरी डेअरी फार्म येथेही अनेकजण विश्रांती घेत होते. काहींनी लॉज तसेच धर्मशाळा यामध्ये वास्तव केले आहे. त्यामुळे शहरात भरतीसाठी आलेल्या तरुणांची गर्दी दिसून येत आहे.

बेळगावसह अन्य जिल्ह्यातील उमेदवारांना संधी

रविवारी बेळगाव, रायचूर, गदग, हावेरीसह इतर जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे बेळगावमधील तरुणांकडून तयारी केली जात आहे. धावणेमध्ये क्रमांक पटकाविल्यास त्यांची शाररीक चाचणी घेतली जाणार आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article