For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घसरणीतून सावरत सेन्सेक्स 85,170 वर झेपावला

06:30 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
घसरणीतून सावरत सेन्सेक्स 85 170 वर झेपावला
Advertisement

 निफ्टीचीही विक्रमी कामगिरी :  अॅक्सिस बँकेचे समभाग वधारले

Advertisement

मुंबई : भारतीय भांडवली बाजारात बुधवारी पुन्हा एकदा दोन्ही निर्देशांक आपल्या घसरणीच्या प्रवासातून सावरत बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत कामगिरीची नेंद करत बंद झाले आहेत. यामध्ये विविध कंपन्यांची तेजी ही बाजाराला लाभदायक ठरल्याचेही दिसून आले आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी-50 बुधवारी विक्रमी उच्चांकावर बंद झाले. बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स दिवसअखेर 255.83 अंकांनी मजबूत होत 0.30 टक्क्यांनी वाढून 85,169.87 च्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला. दिवसभरातील कामगिरीत सेन्सेक्स 84,743.04 आणि 85,247.42 च्या दरम्यान व्यवहार करत राहिला होता.  याआधी, गुंतवणूकदारांनी नफाकमाईचा लाभ घेतल्याने सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 171 अंकांपर्यंत घसरला होता.

दुसरीकडे, एनएसई निफ्टी 63.75 अंकांनी वधारुन 0.25 टक्क्यांच्या तेजीसह निर्देशांक 26,004.15 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीही सुरुवातीच्या व्यवहारात 48.7 अंकांनी घसरलेला होता. सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 20 समभाग तेजीसह बंद झाले. यामध्ये पॉवर ग्रिड, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स हे सेन्सेक्समध्ये टॉप-5 मध्ये वधारले होते. यासोबतच अन्य कंपन्यांच्या कामगिरीत टाटा स्टील, एचडीएफसी बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, सन फार्मा, इन्फोसिस, लार्सन अॅण्ड टुब्रो, टीसीएस आणि मारुती सुझुकी यांचे समभाग हे वधारुन बंद झाले. दुसरीकडे, सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 10 समभाग प्रभावीत राहिले आहेत. यामध्ये टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, टायटन, कोटक बँक आणि एसबीआय याचे समभाग हे सर्वाधिक नुकसानीत राहिले. जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक,  एशियन पेंट्सचे समभाग घसरले.

Advertisement

Advertisement
Tags :

.