महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बॉक्सिंग डे कसोटीसाठी विक्रमी तिकीट विक्रीची अपेक्षा

06:50 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बॉक्सिंग डे कसोटीसाठी विक्रमी तिकीट विक्रीची अपेक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/मेलबोर्न

Advertisement

येत्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात बॉर्डर-गावसकर चषकासाठी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होत आहे. या मालिकेतील 26 ते 30 डिसेंबर दरम्यान येथे होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी विक्रमी तिकीट विक्री होईल, अशी घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे.

2018-19 साली येथे झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याला क्रिकेट शौकिनांचा अमाप प्रतिसाद लाभला होता. बॉक्सिंग डे कसोटीला नेहमीच ऑस्ट्रेलियात शौकिनांची गर्दी होते. आता याच ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील होणाऱ्या कसोटीची तिकीट विक्री विक्रमी राहिल, अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघातील कसोटी मालिकेला ऑस्ट्रेलियात नेहमीच अधिक प्राधान्य दिले जाते. या मालिकेतील पहिली कसोटी 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पर्थ येथे होणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी अॅडलेडओव्हल येथे 6 ते 10 डिसेंबर दरम्यान खेळविली जाणार असून ही कसोटी प्रकाश झोतामध्ये राहिल. तिसरी कसोटी ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर 14 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळविली जाईल. त्यानंतर मेलबोर्नच्या क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या मालिकेतील पाचही आणि शेवटची कसोटी 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनीमध्ये खेळविली जाईल. उभय संघातील ही आगामी कसोटी मालिका चुरशीची अपेक्षित आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article