कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्सवी काळात 52 लाख वाहनांची विक्रमी विक्री

06:30 AM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फाडाच्या आकडेवारीमधून माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

या वर्षीच्या उत्सवाच्या हंगामात भारतातील वाहन क्षेत्राने आतापर्यंतचे विक्रीचे विक्रम मोडले आहेत. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) च्या आकडेवारीनुसार, 42 दिवसांच्या उत्सवाच्या हंगामात यावेळी कारची किरकोळ विक्री 21टक्क्यांनी वाढून 52,38,401 युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या 43,25,632 युनिट्सपेक्षा खूपच जास्त आहे.

या काळात प्रवासी वाहनांची विक्री 23 टक्क्यांनी वाढून 7,66,918 युनिट्सवर पोहोचली. तर, दुचाकी विक्रीत 22 टक्क्यांची वाढ झाली, जी 40,52,503 युनिट्सवर पोहोचली. फाडा अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर म्हणाले की, हा उत्सवाचा हंगाम भारताच्या ऑटो रिटेल इतिहासात एक ‘मैलाचा दगड’ ठरला आहे. जीएसटी 2.0 ने बऱ्याच काळापासून अपेक्षित असलेले काम केले आहे.

विक्रीतील ठळक बाबी

? जीएसटी 2.0 हा एक गेमचेंजर ठरेल, ईव्ही क्रेझ वाढवेल

? फाडा अहवालानुसार, ग्रामीण भागातील चांगली भावना, चांगली रोखिवता आणि कमी जीएसटीमुळे दुचाकी वाहनांच्या विक्रीत सुधारणा

? स्कूटर आणि कम्युटर बाइक्सची विक्री मजबूत राहिली असली तरी, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ग्राहकांची आवडही वाढली

? तीन चाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या विभागांमध्ये अनुक्रमे 9 टक्के आणि 15 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली

? ऑक्टोबर महिन्यात, ऑटोमोबाईल किरकोळ विक्री 41 टक्क्यांनी वाढून 40,23,923 युनिट्सवर पोहोचली

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article