For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पात काळ्या रानकुत्र्याची नोंद

03:09 PM Jun 24, 2025 IST | Radhika Patil
सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पात काळ्या रानकुत्र्याची नोंद
Advertisement

कराड :

Advertisement

सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पात नुकतीच दुर्मीळ काळा रानकुत्रा (मेलेनिस्टिक) आढळला आहे. व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील एका गावात फिरण्यास गेलेल्या कराडचे पर्यटक दिग्विजय पाटील यांना हा कुत्रा दिसला. त्यांनी तो मोबाईलमध्ये टिपला. दिग्विजय पाटील यांनी याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली.

वनविभागाच्या नोंदीनुसार १९३६ मध्ये तमिळनाडूतील कोइम्बतूर वन विभागातील गड्डेसल येथे शिकारी, निसर्गशास्त्रज्ञ, कॉफी प्लांटर आणि स्कॉट्समन आर. सी. मॉरिस यांनी काळा रानकुत्र्याची नोंद केली होती. पाटण तालुक्यातील एका गावाच्या बफर झोनमध्ये दिसलेला हा दिसलेला रान कुत्रा संपूर्ण काळा होता. विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी सदर परिसरात कॅमेरा लावून अधिक माहिती व अभ्यास करण्याच्या सूचना वनरक्षकांना दिल्या आहेत. हा रानकुत्रा कोळशिंदा (वाईल्ड डॉग) या नावाने ओळखला जातो. शास्त्रीय नाव कुओन अल्पिनुस असे आहे. हा रंगाने तांबूस लालसर असतो. रानकुत्र्याचे कान टोकाकडे गोलाकार असतात. शेपटीचा टोकाकडील बहुतांश भाग हा काळसर असतो. उंची ४३ ते ४५ से.मी.पर्यंत असते तर शरीराची लांबी ३ फुटापर्यंत असते. नराचे वजन २० किलोच्या आसपास असून मादीचे वजन नरापेक्षा कमी असते. कळपाने राहणाऱ्या या प्राण्याचे वास्तव्य जंगलामध्ये दिसून येते. रानकुत्रे कळपाने शिकार करतात.

Advertisement

हरीण वर्गातील प्राणी हे त्यांचे आवडीचे खाद्य आहे. कळपाने असल्यास ते गव्यासारख्या मोठ्या प्राण्याचीही शिकार करतात. जीवशास्त्रात मेलेनिस्टिक म्हणजे अशी स्थिती जिथे एखाद्या प्राण्यामध्ये मेलेनिन या रंगद्रव्याचे असामान्यपणे जास्त प्रमाण असते. ज्यामुळे त्याचा रंग नेहमीपेक्षा जास्त गडद होतो, असे रोहन भाटे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.