For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुलैमध्ये इलेक्ट्रीक वाहन विक्रीत विक्रम

06:03 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
जुलैमध्ये इलेक्ट्रीक वाहन विक्रीत विक्रम
Advertisement

3 लाख 27 हजार वाहनांची विक्री : फाडा संघटनेची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था, नोएडा

जुलै महिन्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आता लोकांचा दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करताना इलेक्ट्रीककडे वळला आहे, हे स्पष्ट होते आहे. जुलै 2026 मध्ये देशात पाहता 3 लाख 27 हजार 901 वाहनांची एकंदर विक्री झाली आहे. फाडा या ऑटो क्षेत्रातील संघटनेने ही माहिती दिली आहे. मागच्या तुलनेत ही वाहन विक्री जवळपास 66 टक्के इतकी अधिक आहे. देशात आता विकले जाणारे प्रत्येक आठवे वाहन हे इलक्ट्रीक असल्याचेही फाडाने म्हटले आहे.

Advertisement

ऑटो डिलर्स संघटना फाडा म्हणजे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनच्या मते जुलै महिन्यात 3,27,901 इलेक्ट्रीक वाहनांचा खप झाला आहे. याआधी जून 2026 मध्ये 3,06,220 वाहनांचा खप झाला होता. जुलैमध्ये वाहन विक्रीचा नवा विक्रम नोंदला गेला आहे. याचा अर्थ आता ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीप्रती वाढला आहे.

दुचाकीत प्रथमच 2 लाखाचा टप्पा

याचदरम्यान जुलै 2026 मध्ये सर्वाधिक दुचाकी विक्रीची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात 2 लाख 4 हजारहून अधिक इलेक्ट्रीक दुचाकींची विक्री झाली आहे. मागच्या वर्षी ही विक्री 1 लाख 8 हजारहून अधिक होती. म्हणजेच या श्ा़dरेणीत पाहता 88 टक्के इतकी वाढ झालीय. असं पहिल्यांदाच झालंय की एखाद्या महिन्यात 2 लाखापेक्षा अधिक दुचाकींची विक्री झाली आहे.

32 हजार कार्सची विक्री

याचतुलनेत जुलै महिन्यात इलेक्ट्रीक कार्सचा विक्रीचा विचार करता 32,928 कार्सची विक्री झाली आहे. जी मागच्या वर्षी जुलैमध्ये 17,981 इतकी होती. या गटात विक्रीतील वाढ ही 83 टक्के इतकी झाली आहे. ही विक्री अधिक वाढली असती पण इलेक्ट्रीक कार्सची उपलब्धततेची संख्या कमी होती, असेही फाडाने म्हटले आहे.

तिचाकी विक्री

तर तिचाकीचा विचार केल्यास जुलै महिन्यात 87,055 वाहनांची विक्री झाली आहे. जी मागच्या वर्षाच्या समान महिन्याच्या तुलनेत 25 टक्के अधिक आहे. इलेक्ट्रीक कमर्शियल वाहनांची विक्रीदेखील वेगवान पाहायला मिळाली. 3556 इतक्या कमर्शियल इलेक्ट्रीक वाहनांची विक्री झाली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात 1324 वाहनांची विक्री नोंद होती.

Advertisement
Tags :

.