द्वेषाच्या वातावरणात सलोखा गरजेचा
तुषार गांधी : ‘भारत जोडो यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन : ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकलेंचा सरकारवर हल्लाबोल
कोल्हापूर :
देशातील द्वेषाचे वातावरण घालवायचे असेल तर सलोखा मजबूत करावा लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी केले. हाताश आणि निराशा निर्माण झाली असतानाच राहूल गांधी यांच्या भरत जोडो यात्रेमुळे देशात चेतना जगावल्याचेही त्यांनी सांगितले. राहूल गांधी यांनी काढलेल्या भरत जोडो यात्रेबाबत इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पुस्तकाचे ‘भारतीयत्वाचा पुन: प्रत्यय भारत जोडो यात्रा’ या मराठी अनुवाद केलेल पुस्तकाचे बुधवारी शाहू स्मारक भवन येथे प्रकाशन झाले. या प्रसंगी ते बोलत होते.
तुषार गांधी म्हणाले, देशात श्रीमंत-गरीब अशी दरी निर्माण झाली होती. ब्रिटीशांकडून तोडा फोडा रणनिती आखली जात होती. यामध्येही महात्मा गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे अमुलाग्र बदल झाले. राहूल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रेचेही हेच फलित आहे.
निरंजन टकले म्हणाले, महात्मा गांधी यांच्या 1915 मधील भारत जोडो यात्रेनंतर देशातली लोक महात्मा गांधींना स्वीकारत गेले तसे ब्रिटीश राजवट धोक्यात येत गेली. 100 वर्षानंतर राहूल गांधी यांनी याप्रमाणेच भारत जोडा यात्रा काढली. भाजपच्या सत्तेला सुरूंग लागत जाणार आहे.
मालवण येथील राजकोट किल्यावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर कोणतीच कारवाई होत नाही, ही दुर्देवी आहे. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांनी माफी मागितली. परंतू उपमुख्यमंत्री फडणवीस माफी मागत नाहीत हा अपमान सहन झाला नाही पाहिजे. त्यांना या निवडणूकीत जागा दाखविली पाहिजे.
कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी समतेची लढाई सुरू केली. भारत जोडोला साकार करणारी ही संकल्पना आहे. वाटेल ती किम्मत मोजा पण कोल्हापूरमध्ये ही संकल्पना जिवंत ठेवा, ही संकल्पान कोल्हापुरात जगली तर संपूर्ण महाराष्ट्रात जगणार आहे. शाहूनगरीतील आपण आहोत. खंडनीखोर आणि वसुली करणारे नाही, हे अभिमानाने सांगितले पाहिजे, असेही निरंजन टकले यांनी सांगितले.
विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या
बटेंगे तो कटेंगाचा सामना करायचा असेल तर आपणही एकजुट झाले पाहिजे. एकजूट झालो तर फोडाफोडी करणाऱ्यांना धोका निर्माण होईल, असेही तुषार गांधी यांनी सांगितले. तोडफोडीची भाषा करणाऱ्या विरोधकांना त्यांच्याच भाषेतच उत्तर दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसला भारत जोडोची चेतना टिकवता आली नाही
राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेमुळे तळागळातील लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला. परंतू यात्रेवेळी निर्माण झालेली चेतना आता कमी होऊ लागली आहे. यास काँग्रेसमधील स्ट्रक्चरची चुक आहे. त्यांनी यात्रेवेळीची चेतना टिकविता आलेली नाही, असा खेदही तुषार गांधी यांनी व्यक्त केली.