For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sunetra Pawar | राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; अध्यक्ष सुनेत्रा पवारांना पक्षाच्याच वरिष्ठ पदाधिकाऱ्याची नोटीस

01:10 PM Jul 14, 2026 IST | NEETA POTDAR
sunetra pawar   राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर  अध्यक्ष सुनेत्रा पवारांना पक्षाच्याच वरिष्ठ पदाधिकाऱ्याची नोटीस
Advertisement

मुंबई: राज्याच्या राजकरणातील घडोमोंडीना चांगलाच वेग आला आहे... एकीकडे शरद पवार पक्षामध्ये सगळ काही ठीक नसल्याचे समोर येत आहे.. शरद पवार पक्षाचे काही आमदार हे NDA सोबत जाणार असणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच, आता अजित पवार यांच्या गटात बिनसल्याचे समोर येत आहे... अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील अध्यक्षा पदासाठी विरोध होत असल्याची माहिती समोर येत आहे..

Advertisement

काय आहे नेमकं प्रकरण ?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे.. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार असा उघड संघर्ष पाहायला मिळाला होता.आता थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निवडीलाच आव्हान देण्यात आले आहे.

Advertisement

पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदावरील निवड बेकायदेशीर आणि पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा दावा करत त्यांना थेट नोटीस पाठवली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप झाला असून, पक्षातील अंतर्गत कलह आता शिगेला पोहोचल्याचे उघड झाले आहे.आता या प्रकरणात पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेणार आणि संबंधितांवर काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

Advertisement
Tags :

.