For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वत्र बंडखोरी, कोण मुंबईचा कैवारी!

06:48 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
सर्वत्र बंडखोरी  कोण मुंबईचा कैवारी
Advertisement

मुंबईत शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन : कोणी हसले, काही हिरमुसले

Advertisement

प्रतिनिधी/ मुंबई

एका छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पाएवढा बजेट असलेल्या मुंबई महापालिकेच्या नगरसेवकालाही आमदारासारखाच किंवा मंत्र्याच्या तोडीचा मान असल्याने येथे उमेदवारी न मिळल्याने अनेकजण हिरमुसले आहेत. तर उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झालेल्यांनी हस़ऱ्या चेह़ऱ्याने शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. मात्र उमेदवारी न मिळालेल्या अनेकजणांनी पक्षाचे निशाण बाजूला करत बंडाचे निशाण फडकावले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने मुंबईत सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये उमेदवारांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची गर्दी उसळली होती. शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल केल्याने सकाळपासून दुपारपर्यंत ढोलांच्या दणदणाटाने मुंबई दणाणून गेली होती.

Advertisement

मुंबईचा महापौर मराठीच होईल आणि तो ठाकरे-मनसे युतीचाच होईल, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. तर महापौर भाजपचाच आणि मराठी महापौरच होईल, असे भाजपने ठामपणाने म्हटले आहे. मनसेने जागा वाटपापेक्षा मुंबई आणि मुंबईचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. मात्र सर्वच पक्षात नाराजी आणि  बंडखोरी असल्याने कोण मुंबईचा कैवारी ठरणार असा प्रश्न मुंबईकरांपुढे उभा आहे. त्याचे उत्तर 16 जानेवारीलाच मिळणार आहे.

गेली तीन वर्षे निवडणूक रखडलेल्या मुंबई महापालिकेसह मुदत संपलेल्या सर्व म्हणजेच 27 आणि नवीन 2 अशा 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत.  या महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याच्या  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या निवडणुका होणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 15 डिसेंबर रोजी  पत्रकार परिषद घेत राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली.  राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर शहरांसह एकूण 29 महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. महापालिकांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 असा होता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून छाप पडून राजकारणात प्रवेश करण्याची पहिली पायरी असल्याने या निवडणुकीत संधी मिळावी म्हणून अनेकजण इच्छुक असतात. मात्र सगळ्यांचीच इच्छापूर्ती करणे पक्षनेतफत्वाला शक्य होत नाही. त्यामुळे ज्याला संधी मिळते त्याला न्याय मिळाल्याचा आनंद होतो, तर ज्यांना संधी मिळत नाही त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना असते. त्यामुळे तो एक तर दुस़ऱ्या पक्षात प्रवेश करतो किंवा स्वत:च्याच पक्षात बंडाचे निशाण फडकावतो. तसे यंदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत झाले आहे.

रामदास आठवले महायुतीतून बाहेर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जागावाटपावऊन सुरू असलेल्या ओढाताणीनंतर, पेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतफत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. भाजपने आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करत आठवले यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून 39 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.

बीएसपी स्वबळावर लढणार 100 जागा

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) आपली रणनीती स्पष्ट केली आहे. मुंबईत बीएसपी कुणाशीही युती न करता ‘स्वबळावर’ निवडणूक लढवणार असून साधारणत: 100 जागांवर आपले उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा पक्षाचे महाराष्ट्र झोन प्रभारी अॅड. जय मंगल धनराज यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.