रियलमीचा 4 जी स्मार्टफोन सी 100 आय भारतीय बाजारात सादर
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
चीनी टेक कंपनी रियलमीने भारतात आपला नवीन 4 जी बजेट स्मार्टफोन रियलमी सी 100 आय लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन 15,000 पेक्षा कमी किमतीच्या बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. या फोनचे सर्वात खास वैशिष्ट्या म्हणजे त्याची 6500एमएएच बॅटरी आणि मिलिटरी ग्रेडची मजबूत बॉडी. कंपनीचा दावा आहे की हा फोन 2 मीटर उंचीवरून पडल्यासही टिकाऊ आहे.
रियलमी सी 100 आय हा फोन भारतात फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 4 जी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक आणि ब्लॅक स्कायलाईन सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट, रियलमीची अधिकृत वेबसाइट आणि तुमच्या जवळच्या रिटेल स्टोअर्समध्येही हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.
बजेट सेगमेंटचा फोन असूनही, कंपनीने त्याच्या मजबुतीवर खूप लक्ष दिले आहे. रियलमी सी 100 आय हा एमआयएलएसटीडी 810 एच प्रमाणित मिलिटरी ग्रेड बॉडीवर बनवलेला आहे. चाचणीनुसार, 2 मीटर उंचीवरून काँक्रीटवर पडल्यानंतरही तो सुरक्षित राहतो. यासोबतच, धूळ आणि पाण्याच्या शिडकाव्यापासून संरक्षण करण्यासाठी या डिव्हाइसला आयपी 64 रेटिंग देण्यात आले आहे.
डिस्प्ले: या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह 6.8-इंचाचा एचडीसह एलसीडी डिस्प्ले आहे. स्मूथ क्रोलिंगसाठी यात 120एचझेडचा रिफ्रेश रेट आणि सूर्यप्रकाशातही स्पष्ट दिसण्यासाठी 900 हग्ts ची पीक ब्राइटनेस आहे. क्रीनच्या सुरक्षेसाठी, यात पांडा ग्लासचे संरक्षण थर आहे.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनलवर 8-मेगापिक्सलचा सिंगल वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरच्या बाजूला 5-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनच्या कॅमेरामध्ये पोट्रेट, नाईट मोड आणि ड्युअल-ह्यू व्हिडिओसारखे इन-बिल्ट मोड्स आहेत.
परफॉर्मन्स: हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर आधारित रियलमी ळघ् वर चालतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, यात 12 नॅनोमीटर प्रोसेसवर बनवलेला ऑक्टा-कोअर युनिसॉक टी 7250 प्रोसेसर आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 2.0 जीएचझेड पर्यंत आहे. ग्राफिक्ससाठी यात आर्म माली-जी 57 जीपीयु समाविष्ट आहे.
जेमिनी एआय बटण आणि बेसिक कॅमेरा सेटअप
रियलमीचा फोन नेक्स्ट एआयला सपोर्ट करतो, ज्यामध्ये ग्राहकांना गूगल जेमिनीसाठी एक डेडिकेटेड शॉर्टकट बटण मिळेल. याच्या माध्यमातून एआय फीचर्स थेट अॅक्सेस करता येतात. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 3.5एमएम हेडफोन जॅक, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 आणि ओटीजीला सपोर्ट आहे.