रियलमीचा पी 4 लाइट स्मार्टफोन लाँच
6300 एमएएच बॅटरी : 10 हजाराच्या आत किंमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रियलमी कंपनीने आपला नवा पी 4 लाईट हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे. पी4 सिरीज अंतर्गत सादर केलेल्या स्मार्टफोनला युनिसॉक टी7250 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 6.74 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले यामध्ये देण्यात आला असून बॅटरी मात्र 6300 एमएएच क्षमतेची दमदार देण्यात आली आहे.
यामध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची काही वैशिष्ट्योही समाविष्ट करण्यात आली आहेत. 4जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येणाऱ्या फोनची किंमत साधारण 10 हजार रुपये असणार असून 4जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज च्या स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपये इतकी असणार आहे. हा स्मार्टफोन सी ब्ल्यू, बीच गोल्ड, ऑब्सीडियन ब्लॅक या तीन रंगांमध्ये आहे.
कधी विक्री होणार
रियलमीच्या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तसेच निवडक रिटेल स्टोअर्सवरती हा स्मार्टफोन विक्रीकरता 24 फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. सुरुवातीच्या ग्राहकांसाठी कंपनीने 1 हजार रुपये सवलत देऊ केली आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 15 बेसड रियलमी युआय याच्यावरती चालणारा आहे.